विविध क्षेत्रातल्या लोकांनी एकत्र जमायचं, सलग तीन दिवस, चार रात्री एकत्र रहायचं, एकमेकांशी गप्पा मारायच्या, एकमेकांच्या कलावंत, नट, लेखक म्हणून अगदी रसिक म्हणून अभिव्यक्त होण्याच्या जाणिवा जाणून घ्यायच्या, त्यावर बोलायचं, काही पटलं नाही तर रितसर वादही घालायचे, प्रत्रेकानं स्वत: बोलावं, आजपर्यंत माणूस म्हणून जगण्याचा प्रवास उलगडून दाखवावा, हे सांगता सांगता समोरच्रालाही बोलतं करावं, गप्पा माराव्यात, असा सगळा रा मी तू संमेलनातला
बिनचौकटीचा कार्यक्रम।
बिनचौकटीचा कार्यक्रम।
संमेलन म्हटलं की, तीन-चार दिवस भरगच्च कार्यक्रम, परिसंवाद, चर्चासत्र, काही मुलाखती, त्यात मान्यवरांचा सहभाग, असा काहीसा साचेबद्ध कार्यक्रम ठरलेला। मात्र, या सगळ्या साचेबद्ध चौकटीत न रमता संमेलनाच्या खऱ्या अर्थापर्यंत नेणारं ‘मी तू संमेलन’ नुकतच पाचगणी जवळच्या खिंगर इथं झालं।पाचगणीपासून थोडंसं आत ‘टेबल लॅण्डच्या’ एका कपारीत वसलेलं खिंगर हे गाव। जिथं सहसा मिळणाऱ्या सोयी-सुविधा सहज उपलब्ध होणार नाहीत. मुळात कल्पनाही तशी की, विविध क्षेत्रातल्या लोकांनी एकत्र जमायचं, सलग तीन दिवस, चार रात्री एकत्र रहायचं, एकमेकांशी गप्पा मारायच्या, एकमेकांच्या कलावंत, नट, लेखक म्हणून अगदी रसिक म्हणून अभिव्य्नत होण्याच्या जाणिवा जाणून घ्यायच्या, त्यावर बोलायचं, काही पटलं नाही तर रितसर वादही घालायचे, असा सगळा अनौपचारिक कार्यक्रम।‘
अक्षर मानव’चे मागच्या वर्षी ‘मी संमेलन’ होतं. स्वत:ला केंद्रित ठेवून होणाऱ्या गप्पा असा काहीसा त्याचा विषय. त्यातही अनेक दिग्गज सहभागी झाले होते. यंदाच्या ‘मी तू संमेलना’मध्ये वात्रटिकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ लेखक रंगनाथ पठारे, लेखिका मेघना पेठे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार, कवी-नट किशोर कदम, लेखक-दिग्दर्शक अमित राय, चित्रकार श्रीधर अंभोरे, कवी लोकनाथ यशवंत, समीक्षक अविनाश सप्रे, लेखक सतीश तांबे, ‘जोगवा’ची पटकथा लिहिणारे आणि राज्य शासनाच्या पुरातत्त्व खात्याचे संचालक संजय पाटील, गझलकार दिलीप पांढरपट्टे यांच्यासहित विविध क्षेत्रातले मान्यवर या संमेलनात सहभागी झाले होते. संमेलनाची सुरुवात सकाळी दहा वाजता व्हायची. मात्र, यावेळी कोण बोलणार? कशावर बोलणार? हेही ठरलेलं नाही. ऐनवेळी संयोजक येणार या ‘बड्या’ मंडळींपैकी कोणाही दोघांना बोलावणार आणि सुरू व्हायचा रंगतदार गप्पांचा कार्यक्रम. त्यात त्यांनी स्वत: बोलावं, आजपर्यंत माणूस म्हणून जगण्याचा प्रवास उलगडून दाखवावा, हे सांगता सांगता रसिकांनाही बोलतं करावं, गप्पा माराव्यात, असा सगळा बिनचौकटीचा कार्यक्रम.अशा प्रकारच्या गप्पांमधून अनेक विषय पुढे आले.
मेघना पेठे आणि सतीश तांबे यांच्या चर्चेतून एक विषय आला की, ग्रामीण भाषेत जे लिखाण येतंय, त्यात असे काही शब्द येतात की जे शहरी वाचकांना समजत नाहीत. मग ते समजण्यासाठी काहीतरी व्हायला हवं. या दोघांच्याही साहित्यात आलेल्या लैंगिकतेचं वर्णन किंवा अशा प्रकारच्या लिखाणातून एक लेखक म्हणून घरचं काही दडपण जाणवतं का? मग त्याला एक लेखक म्हणून कसे सामोरे जाता? याबाबत सतीश तांबे यांनी सांगितलं की, कोणतंही दडपण लिहिताना नसतं; पण वाचकांचं काहीसं दडपण एक लेखक म्हणून मनावर असतं यासाठी कोणती शैली वापरावी, भाषा कशी असावी असे प्रयोगही त्यातनं होतात; पण लेखक म्हणून जे म्हणायचं असतं ते ठामपणे लिखाणातून मांडतो.माझी अस्मिता मुंबईत लेखक म्हणून नाही. मी जिथे राहते, तिथला वाण्यावाला, दूधवाला त्यांना माहितीही नसतं की मी काही लिहिते. लेखक म्हणून मी एकटी असते. त्यामुळं तसं दडपण कधीच वाटलं नाही, असं मेघना पेठे यांचं म्हणणं होतं.नाटककार म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेल्या दिलीप जगताप यांचे 1980 साली ‘एक अंड फुटलं’ हे पहिलं नाटक आलं. तेव्हापासून ते आजपर्यंत (2010 जा खेळायला जा) त्यांनी 22 नाटकं लिहिली. त्यांच्या बोलण्यातून प्रगल्भ नाटकाबाबत विविध पैलू समोर आले. तुषार भद्रेही त्याच भागातले एक प्रसिद्ध नाटककार. 1976 पासून नाटकासाठी अक्षरश: सर्वस्वी अर्पण केलेले. कलाकारानं माणसं घडवली पाहिजेत, या विजय तेंडूलकरांच्या सूचनेवरून त्यांनी आजपर्यंत जवळपास 10 हजार रंगकर्मींना प्रशिक्षण दिलं आहे.
सरकारी जबाबदाऱ्या सांभाळून साहित्यात तर साहित्य सांभाळून सरकारी जबाबदारी समर्थपणे पार पाडणारे गझलकार दिलीप पांढरपट्टे आणि ‘जोगवा’ चित्रपटाची पटकथा लिहिणारे संजय पाटील (पुरातत्त्व खात्याचे संचालक) यांनीही आपल्या जगण्याच्या जाणीवा मोकळेपणाने व्य्नत केल्या. दिलीप पांढरपट्टेंनी अगदी सुरुवातीच्या काळात लिहिलेली गझल कवी सुरेश भट यांना पाठवली तेव्हा त्यांचं पत्र आलं की, जी पाठवली ती गझल नाही. त्यात काही तंत्राच्या चुका आहेत, पण तू चांगला कवी आहेस, मार्गदर्शन आणि प्रयत्न केल्यास चांगल्या गझल लिहिशील. मला खात्री आहे की, तू मला पुण्यात येऊन भेटशील. असं पत्र पाठवून खाली लिहिलं तुझा चाहता सुरेश भट.यामुळं खूपच बळ मिळाल्याचं पांढरपट्टे यांनी नोंदवलं. त्यानंतर जाणीवपूर्वक ऊर्दू शिकलो. यशवंत देव यांच्या सांगण्यावरून कोळी गीतं लिहिली. अशोक पत्की यांच्या सांगण्यावरून लावण्या लिहिल्या. दिलीप पांढरपट्टे हे सध्या सिंधुदुर्गमध्ये प्रशासकीर सेवेत आहेत. हा प्रशासकीय भार सांभाळूनही ते आपली साहित्यनिर्मिती करत आहेत. आनंदी जगण्याची वृत्ती असल्याने स्वत:शीच नेहमी प्रयोग करत राहिलो. या प्रयोगातूनच नवं नवं शिकत गेलो. असं त्यांनी सांगितलं.पुरातत्त्व खात्याचे उपसंचालक या महत्त्वाच्या पदाचा ताण सांभाळून आवड म्हणून चित्रपट क्षेत्रात काम करणारे संजय पाटील यांनी ‘जोगवा’ या चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. हे सर्वांना माहीत आहेच. सध्या ते ‘पांगिरा’ या चित्रपटावर काम करीत आहेत. सध्या ते एक कादंबरी लिहितायेत. माणसाचं बदललेलं जगणं, त्याचा प्राण्यांवर, निसर्गावर झालेला परिणाम असा काहीसा वरवर सोपा वाटणारा; पण अतिशय गुंतागुंतीचा विषय संशोधन करून ते आपल्या लिखाणातून मांडणार आहेत. यावर आजपर्यंत केलेल्या संशोधनाबद्दल त्यांनी सांगितलं. ‘सामना’ चित्रपटाची निर्मिती करणारे रामदास फुटाणे हे आपल्या जीवनातल्या ‘रखडलेल्या काळाबद्दल’ भरभरून बोलले. ‘सामना’ काढला त्यावेळी तो चालला नाही दोन वर्षांनी त्याला प्रतिसाद मिळाला. दरम्यानच्या काळात खिशात पैसे नसणं, कुठं जायला यायला पैसे नसल्याकारणानं भाषणाची निमंत्रणं नाकारणं, त्याआधी ग्रामीण राजकारणावरचा सिमेमा ‘सामना’ या चित्रपटाचं लिखाण करण्यासाठी विजय तेंडूलकरांना तयार करणं. चित्रपटाचं नाव आधी ‘सावलीला भिऊ नको’ असं ठेवण्यात आलं होतं, नंतर ते बदलून ‘सामना’ असं केलं. हेही त्यांच्या बोलण्याच्या ओघात समजलं. अभिनेता गिरीष साळवी आणि मिलिंद शिंदे यांनीही आपल्या अभिनयाच्या प्रवासाबद्दल सांगितलं. सुरुवातीला लागलेली हेल्परची नोकरी त्यानंतर नाटकाच्या वेडानं आजपर्यंत झालेला प्रवास. त्यातून पैसे फारसे मिळाले नसल्याचं कबूल करताना आजवर मला माझ्या बायकोनं पोसला हेही साळवी यांनी अभिमानानं सांगितलं. नटांना जसा चेहरा असतो तसा मला नाही. मुळातच मला जी माणसं भेटली त्यांच्यामुळे मी नट झालो. असं मिलिंद शिंदे यांनी नमूद केलं. नट म्हणून ओळख असणारे मिलिंद शिंदे पुस्तकरूपातही आपल्याला भेटणार आहेत. लवकरच त्यांचा एक लेखसंग्रह प्रकाशित होणार आहे.
स्त्रीला स्त्री म्हणून अनेक ‘वेगळ्या’ अनुभवांना सामोरं जावं लागतं, त्यावर भाष्य केलं प्रकाशक मीना कर्णिक आणि सुमती लांडे यांनी. बोलण्यासारखं काहीच नाही असं म्हणत सुरुवात झालेल्या दोघींनीही भरभरून सांगितलं. कादंबरीकार रंगनाथ पठारे आणि समीक्षक अविनाश सप्रे यांनी साहित्य क्षेत्रात असलेल्या लेखक, प्रकाशक, वाचक, समीक्षक या घटकांबद्दल सांगितलं. साहित्य प्रक्रियेत वाचकाचं स्थान महत्त्वाचं आहे. लेखकापुढे वाचकाचा दरारा निर्माण होईल, अशी स्थिती अजून नाही त्यासाठी वाचक प्रगल्भ व्हायला हवा, असा सूर या दोघांच्या बोलण्यातून निघाला.संमेलनात सर्वांत लक्षात राहिला तो ‘जोगवा’ या चित्रपटात काम केलेल्या कवी किशोर कदम यांनी सांगितलेला एक विलक्षण अनुभव. चित्रपटाचं शूटिंग सुरू होण्याअगोदर त्यांनी जेव्हा पुरुषांचा पेहराव उतरवून स्त्रीचा साडी-ब्लाऊज असा पोषाख घातला. तेव्हा आपण पुरुष नाही, आपल्यातलं पुरुषत्व संपलं अशी भावना त्यांच्या मनात आली. हा रोल सोडावा असंही वाटलं; पण दुबेजींच्या तालमीत तयार झालेल्या किशोरला समजलं की, या अभिनयासाठी नेमकं हेच फिलींग पकडायला हवं. तेच पकडून संपूर्ण चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. तसंच कलावंत म्हणून दरवेळी नैराश्याच्या गर्तेत अडकणं होतं, त्यावेळी खूप ‘लोनली’ वाटतं. अशा वेळी नैराश्याच्या गर्तेत स्वत:चाच हात घेऊन जगत आल्यानं या ‘लोनली’ पणातून बाहेर येणं होतं. प्रत्येकालाच असं वाटतं, त्यातून बाहेर येण्यासाठी प्रत्येकाने स्वत:चे मार्ग शोधले पाहिजेत, या किशोर कदमच्या बोलण्यात सर्वच जण रमून गेले होते.तीन दिवस (1,2 आणि 3 ऑ्नटो) रंगलेल्या या संमेलनाचा ढाचा वेगळा असल्यानं प्रत्येकालाच ते भावलं. यात प्रत्येकाचाच प्रत्येकाशी संवाद झाला. आलेली सर्व मंडळी ही राहती असल्यानं वाट्टेल तेव्हा हवं त्याला गाठावं, त्यानं लिहिलेल्या, केलेल्या भूमिकेबद्दल वाटलं ते सांगावं, गप्पा माराव्यात, असं काहीसं मोकळं आणि संमेलनाच्या रुळलेल्या चौकटी मोडून जमण्याचा हा प्रयोग असल्यानं सर्वांनाच एकमेकांच्या जगण्याचे कंगोरे कळण्यास मदत होते.
प्रत्येकाची जगण्याची म्हणून काही विधानं असतात. ती विधानं एकमेकांना कळावी. कळालेली विधानं एकमेकांपर्यंत पोहोचवावीत. मानवी जगणं संवादी पातळीवर व्य्नत होत राहण्यासाठी एकत्र येणं हे महत्त्वाचं आहे. यासाठी संमेलन ही अगदी योग्य जागा आहे. मात्र, मोठ्या गर्दीत संमेलनाचा हा हेतू साध्य होताना दिसत नाही. अगदी स्वत:लाच संमेलन ‘जगल्याचा’ आनंद ही मिळत नाही. त्यादृष्टीनं या संमेलनात अगदी आपसूकपणे एकमेकांशी खऱ्या अर्थानं संवाद साधता आला.

राजन खान
संमेलनातून एकमेकांचे सम्मीलन झाले हा केवळ औपचारिक उरकाउरकीचा कार्यक्रम राहिला नाही। माणसं एकत्र आली पाहिजेत, एकमेकांमध्ये मिसळली पाहिजेत, आणि केवळ तीन दिवसांसाठी नाही तर आयुष्यभरासाठीचं माणूस म्हणून जुळणं व्हावं हा हेतू यामागे होता. केवळ साहित्य क्षेत्रासाठीच नव्हे तर जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात अशा प्रकारे मानवी नात्यांची जुळवणूक झाली पाहिजे.
मेघना पेठे
अशा छोट्या प्रकारच्या संमेलनात व्यक्ती व्यक्तींचा थेट संपर्क होऊ शकतो, त्यामुळं एक कलावंत म्हणून एकमेकांचे जगण्याचे संघर्ष, त्याचे बारीक तपशील जाणून घेणं सहज शक्य जाले
रंगनाथ पठारे
कलावंताला स्वत:च्या संदर्भात आणि भोवतालसंदर्भात काही प्रश्न पडलेले असतात, या प्रश्नांची उत्तरं या संमेलनामुळं मिळाली। कलावंतांचे दृष्टिकोन कळाले, ‘शेअरिंग’ झालं, तसंच कलावंताला कलाकृतीबाबत ‘फिडबॅक’ हवा असतो तो इथं मिळाला
मिलिंद शिंदे
विपश्यनेत आपण मौन धारण करतो ते अव्यक्त असतं, त्याचप्रमाणे स्वत:कडेच एका वेगळ्या पातळीवरुन बघण्याचा हा व्यक्त असा फॉर्म वाटला। यामुळं स्वत:चेच वेगवेगळे पडदे उघडले गेले। तसेच इतरांमध्येही आपला शोध घेण्याची प्रक्रिया सहजपणाने झाली।
रामदास फुटाणे
संमेलनात विविध क्षेत्रातले कलावंत असल्याने त्यांचा संघर्ष समजावून घेता आला। प्रत्येकाची एक कलावंत म्हणून जी काही जडण घडण झाली आहे, जो काही संघर्ष झालेला आहे तो यानिमित्तानं कळाला. त्यामुळं कलावंताच्या जाणिवाही प्रगल्भ झाल्या. गर्दीच्या संमेलनात हे सहसा शक्य होत नाही